फील्डमार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमध्ये स्थायिक झालेल्या एका सुखवस्तू पारशी कुटुंबात 3 एप्रिल 1914 रोजी झाला. चार मुले आणि दोन कन्या असलेल्या या कुटुंबात माणेकशा यांचा नंबर पाचवा. नैनितालच्या शेरवूड विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते खरेतर इंग्लंडला जाणार होते. परंतु वयाने सॅम खूपच लहान आहे असे लक्षात येताच वडिलांनी त्यांना अमृतसर कॉलेजला घातले. महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यानंतर त्यांना डेहरादूनच्या ‘इंडियन मिलिटरी अकॅडेमी’ मध्ये प्रवेश मिळाला व […]