Marathi

Marathi Posts



Swami Vivekananda
स्वामी विवेकानंदांचा विश्वबंधुत्वाचा संदेश आज जगाच्या कानाकोप-यात पसरत आहे. कोलकत्त्यात 1863 मध्ये नरेंद्रनाथ (स्वामी विवेकानंद) यांचा जन्म झाला. 1864 मध्ये नरेंद्रनाथ B.A. परीक्षा उत्तीर्ण झाले. 1880 साली सिध्द योगी रामकृष्णपरमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर 1887 साली भारतात मठांची स्थापना करुन देशस्थितीही जाणून घेतली. 1893 मध्ये शिकागो परिषद त्यांनी गाजवली. हिंदू धर्माकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्चात्य जगातील लोकांना स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची महती पटवून दिली आणि हिंदू धर्माची पताका जागतिक क्षितिजावर फडकत ठेवली. […]

यशोगाथा – 8



Vijay Tendulkar
मानवी नातेसंबंधांचा अनेक कोनातून विचार करून त्यातील गुंतागुंतीचे पदर उलगडून दाखविणारे लेखक, नाट्यसंहितेत विषयाच्या अनुषंगाने प्रयोगशीलता आणणारे समर्थ चिंतक आणि हिंसा, क्रौर्य, लैंगिकता, शोषण, व्यसनाधीनता असा कोणताही वर्ज्य नसणारे बंडखोर साहित्यिक म्हणून विजय तेंडुलकर यांचा लौकिक होता. विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1928 मध्ये झाला. गिरगावातील एका चाळीत वाढलेल्या तेंडुलकरांचे मन मात्र पारंपारिक धर्तीच्या शिक्षणात कधीच रमले नाही. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला […]

यशोगाथा – 7


Dr. Abhay and Rani Bang
      डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली या सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यात आपल्या ‘सर्च’ या सेवाभावी संस्थेमार्फत चालू केलेल्या कामाची कीर्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आज या दाम्पत्याच्या प्रेरणेमुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील बालमृत्यूंचे प्रमाण 75 टक्क्यांनी खाली आले आहे. अनेक महिला आदिवासींना उपचार करण्यात त्यांनी सक्षम बनविले आहे. 80 खेड्यांमध्ये डॉ. बंग यांनी शिकविलेले आरोग्य संघटक कार्यरत असून बंग यांच्या या आरोग्यविषयक अनोख्या कार्यक्रमाची […]

यशोगाथा – 6



Sam Mankeshaw 1
फील्डमार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमध्ये स्थायिक झालेल्या एका सुखवस्तू पारशी कुटुंबात 3 एप्रिल 1914 रोजी झाला. चार मुले आणि दोन कन्या असलेल्या या कुटुंबात माणेकशा यांचा नंबर पाचवा. नैनितालच्या शेरवूड विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते खरेतर इंग्लंडला जाणार होते. परंतु वयाने सॅम खूपच लहान आहे असे लक्षात येताच वडिलांनी त्यांना अमृतसर कॉलेजला घातले. महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यानंतर त्यांना डेहरादूनच्या ‘इंडियन मिलिटरी अकॅडेमी’ मध्ये प्रवेश मिळाला व […]

यशोगाथा – ५


JRD Tata 1
1904 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जन्मलेल्या जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचे सर्वांना भावणारे ‘जेआरडी’ हे टोपण नाव होते. फ्रान्स, जपान आणि इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जेआरडी यांनी एक वर्षासाठी फ्रान्सच्या लष्करी प्रशिक्षणाचा अनुभवही घेतला होता. त्यांना फ्रान्स लष्कर अथवा केंब्रिजमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा होती; परंतु 1925 साली वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना वडिलांनी भारतात बोलावून घेतल्याने त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपुरे राहिले. त्याची बोच त्यांना आयुष्यभर होती. परंतु अपरिचित असलेल्या देशामध्ये […]

यशोगाथा – 4



Ravindranath Tagore
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला 1912 या वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर कोणत्याही भारतीय लेखकास हा मान मिळालेला नाही. यावरूनच रवींद्रनाथ टागोर यांचे मोठेपण सिद्ध होते.  टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. गुरुदेव टागोर यांना चित्रकला, शिक्षण आदी क्षेत्रांतही चांगली गती होती, जाण होती आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कार्येही केली. टागोर यांनी काव्यप्रकार हाताळण्याबरोबरच ‘नौकाडूबी‘, ‘गोटा‘ यांसारख्या कादंबऱ्या, ग्रंथ, नाट्यलेखन, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र आदी. […]

यशोगाथा – ३