Cancellation of High Denomination Notes by Govt. of India


शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार रु. 500 आणि रु. 1000 च्या नोटा आजपासून चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. यापुढे त्या वैध मानल्या जाणार नाहीत.

शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेची कमीत-कमी गैरसोय व्हावी यासाठी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत:

 

(i) 30 डिसेंबर, 2016 च्या कार्य कालावधीपर्यंत, जुन्या रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये किंवा आरबीआयच्या कार्यालयांतून नागरिकांना/व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यात भरता येऊ शकतात/किंवा इतर नोटांच्या रुपात बदलून घेता येऊ शकतात.

(ii) एका व्यक्तीद्वारे वैध चलन मुद्रा असलेल्या एकूण रु. 4,000/- किंवा त्यापेक्षा मूल्याच्या नोटाच फक्त इतर नोटांच्या रुपात बदलून घेता येऊ शकतात. त्यासाठी जुन्या नोटा व आरबीआयने दिलेल्या विशिष्ट स्वरुपात मागणीची पावती आपल्या स्वतःच्या ओळखपत्रासह बँकेकडे सादर करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारची सुविधा पोस्टाच्या कार्यालयांतदेखील सुरु केली जाईल.

(iii) जुन्या बँक नोटा इतर नोटांच्या रुपात बदलून घेण्याच्या 4,000/- रुपयांच्या मर्यादेचा 15 दिवसानंतर आढावा घेतला जाईल आणि गरजेनुसार योग्य सूचना जारी केली जाईल.

(iv) बँकेतील खातेधारकाच्या खात्यात किती मूल्याच्या किंवा किती संख्येने बँक नोटा जमा केल्या जाव्यात यावर कोणतीही मर्यादा नाही. असे असले तरी, ज्या खातेदारांच्या खात्यांचे केवायसी निकष पूर्ण करण्यात आलेले नसतील अशा खात्यांमध्ये केवळ 50,000/- मूल्याच्या बँक नोटा जमा करता येऊ शकतात.

(v) वैध ओळख पुरावा सादर केल्यानंतर मानक बँकिंग प्रक्रियेनुसार कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या खातेदाराला त्याच बँकेद्वारे बँक नोटांच्या मूल्याइतकीच समान रक्कम खातेदाच्या खात्यावर जमा केली जाईल.

(vi) बँक नोटांच्या मूल्याइतकीच समान रक्कम तृतीय पक्षाच्या खात्यावर जमा करता येऊ शकते पण यासाठी खातेधारकाने मानक बँकिंग प्रक्रियेचा अवलंब करून यासाठी विशिष्ट अधिकृतता प्रदान करणे गरजेचे आहे आणि प्रत्यक्ष व्यवहार करणाऱ्या व्यक्तीस वैध ओळख पुरावा सादर करावा लागेल.

(vii) 24 नोव्हेंबर, 2016 च्या कार्य कालावधीपर्यंत, पहिल्या पंधरवढ्यात एका बँक खात्यातून, बँक काउंटरवरून किमान रु. 10,000/- काढता येऊ शकतात, आणि एका आठवड्यात कमाल रु. 20,000/- काढता येऊ शकतात.

(viii) चेक, डिमांड ड्राफ्ट, क्रेडीट/डेबिट कार्ड्स, मोबाईल वॉलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर अशा खाते वापराच्या रोख-रक्कमरहित पद्धतींच्या वापरावर कोणतेही बंधन नसेल.

(ix) 18 नोव्हेंबर, 2016 पर्यंत एटीएम मशीन्स मधून केवळ 2,000/- रुपये प्रति कार्ड प्रतिदिवस काढता येतील, ही मर्यादा 19 नोव्हेंबर, 2016 पासून पुढे 4,000/- रुपये प्रति कार्ड प्रतिदिवस अशी असेल.

 

Indian Currency Notes

 

(x) ज्या लोकांना 30 डिसेंबर, 2016 पर्यंत त्यांच्याकडील रद्द झालेल्या जुन्या बँक नोटा बदलून घेता येणार नाहीत किंवा खात्यात भरता येणार नाहीत, त्यांच्यासाठी अजून एक संधी दिली जाईल. नंतरच्या कालावधीमध्ये आरबीआयद्वारे सूचित करण्यात आलेल्या कार्यालयांत त्यांना भारतीय रिझर्व बँकेने सांगितल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्या बदलून घेता येऊ शकतात किंवा खात्यात भरता येऊ शकतात.

(xi) दिनांक 9 नोव्हेंबर, 2016 रोजीबँका व सरकारी कोषागारे बंद ठेवण्यात यावीत अशी सूचना देखील जारी केली जात आहे.

(xii) याचबरोबर, दिनांक 9 व 10 नोव्हेंबर, 2016 रोजी सर्व एटीएम, रोख भरणा मशीन्स, कॅश रिसायकलर्स आणि रोख रकमेच्या पावती आणि देयकासाठी वापरण्यात येणारी सर्व मशीन्स बंद ठेवण्यात येतील.

(xiii) बँक शाखा आणि सरकारी कोषागरांचे कामकाज 10 नोव्हेंबर, 2016 पासून सुरु होईल.

(xiv) जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी, पहिल्या 72 तासांसाठी, शासकीय रुग्णालये आणि औषधालये/रेल्वे तिकिटांचे काउंटर्स, शासकीय तिकीट काउंटर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बसेस आणि विमानतळांवरील विमान तिकीट काउंटर्स; ग्राहक सहकारी संस्था; दुग्ध केंद्रे, स्मशान/दफनभूमी; सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या पेट्रोल/डीझेल/ गॅस स्टेशन्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवासी आगमन आणि निर्गमनासाठी आणि एका विशिष्ट मूल्यापर्यंत परदेशी पर्यटकांना विमानतळांवर विदेशी चलन देवाणघेवाण करण्यासाठी जुन्या बँक नोटांची स्वीकृती केली जाईल.

 

संदर्भ: अर्थमंत्रालय, भारत सरकारचे दि. 08 नोव्हेंबर, 2016 रोजीचे प्रसिद्धीपत्रक



 


About Sourabh Bhunje

Sourabh Bhunje, B.E. IT from Pune University. Currently Working at Techliebe. Professional Skills: Programming - Software & Mobile, Web & Graphic Design, Localization, Content Writing, Sub-Titling etc.

Leave a comment