शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार रु. 500 आणि रु. 1000 च्या नोटा आजपासून चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. यापुढे त्या वैध मानल्या जाणार नाहीत. शासनाने निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेची कमीत-कमी गैरसोय व्हावी यासाठी खालील मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत: (i) 30 डिसेंबर, 2016 च्या कार्य कालावधीपर्यंत, जुन्या रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये किंवा आरबीआयच्या कार्यालयांतून नागरिकांना/व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यात भरता येऊ शकतात/किंवा इतर नोटांच्या रुपात बदलून घेता येऊ शकतात. […]