स्वामी विवेकानंदांचा विश्वबंधुत्वाचा संदेश आज जगाच्या कानाकोप-यात पसरत आहे. कोलकत्त्यात 1863 मध्ये नरेंद्रनाथ (स्वामी विवेकानंद) यांचा जन्म झाला. 1864 मध्ये नरेंद्रनाथ B.A. परीक्षा उत्तीर्ण झाले. 1880 साली सिध्द योगी रामकृष्णपरमहंसांच्या संपर्कात आल्यानंतर 1887 साली भारतात मठांची स्थापना करुन देशस्थितीही जाणून घेतली. 1893 मध्ये शिकागो परिषद त्यांनी गाजवली.
हिंदू धर्माकडे काहीशा तुच्छतेनेच पाहणाऱ्या पाश्चात्य जगातील लोकांना स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची महती पटवून दिली आणि हिंदू धर्माची पताका जागतिक क्षितिजावर फडकत ठेवली. शालेय वयात खरेतर स्वामी विवेकानंदांवर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. महाविद्यालयीन जीवनात ते ब्राम्हो समाजाकडे आकृष्ट झाले होते. मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. परंतु 1880 साली ते “रामकृष्ण परमहंस” या सिद्ध योगीपुरुषाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे विचार संपूर्णतः पालटले. ते सनातन हिंदू धर्म व अद्वैत तत्वज्ञानाचे आजन्म समर्थक बनले. 1887 साली त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली व सर्व भारतभर प्रवास करून आपल्या देशबांधवांची एकूण स्थिती समजावून घेतली. काही काळ हिमालयात जाऊन त्यांनी योगसाधनाही केली. 1893 साली जेव्हा ते शिकागोमधील धर्म परिषदेत सामील झाले त्यांनतर त्यांना जागतिक स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेत त्यांचे अनेक शिष्य निर्माण झाले. ‘मार्गारेट नोबेल’ या,’भगिनी निवेदिता’ बनून भारतात आल्या.
स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य देशातील भौतिकवादाचा अध्यात्मवादाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. “खऱ्या सुखप्राप्तीसाठी भौतिकवादाला अध्यात्माची जोड मिळणे आवश्यक आहे आणि अध्यात्माची शिकवण जगाला केवळ भारतच देऊ शकतो” असे स्वामी विवेकानंद कायम म्हणत. मात्र त्याचबरोबर समाजसुधारणेच्या कार्यालाही त्यांनी महत्व दिले. भारतीयांनी आपल्या दुबळेपणाचा त्याग करून बल, शौर्य, सत्य आणि सश्रद्ध बुद्धिवाद या मुल्यांचा अंगीकार करावा हि स्वामींची शिकवण आजच्या काळातही बरोबर लागू ठरते.
“विवेकानंदांनी भारतीयांना स्वदेशाभिमान आणि राष्ट्रभक्तीची शिकवण दिली. आपले राष्ट्र सामर्थ्यशाली बनावे हि त्यांची आंतरिक कळकळ होती.”
“संकलित बातम्यांमधून“