कोरोना प्रश्नोत्तरे – भाग 1


कोरोना प्रजातीतील विषाणू, COVID-19 हे काय आहेत आणि ते सार्स (SARS) शी कसे संबंधित आहेत?

कोरोना विषाणू म्हणजे काय आहे?

What is a coronavirus?

कोरोना विषाणू ही विषाणूंची एक मोठी जमात आहे जी प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये आजार निर्माण करू शकते. मानवांमध्ये, वेगवेगळ्या कोरोना प्रजातीतील विषाणूंमुळे सर्दीपासून ते MERS आणि SARS अशा प्रकारचे अधिक गंभीर प्रकारचे आजार म्हणजेच श्वसन संक्रमणे होतात. नुकत्याच शोध लागलेल्या कोरोना विषाणूमुळे कोरोना विषाणू COVID-19 हा रोग होतो.

COVID-19 काय आहे?

What is COVID-19?

नुकत्याच शोध लागलेल्या कोरोना विषाणूमुळे COVID-19 हा संसर्गजन्य रोग होतो. डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान येथे या विषाणूचा उद्रेक होण्यापूर्वी हा नवीन विषाणू आणि हा रोग मानवाला अज्ञात होता.

COVID-19 हा SARS सारखाच आहे का?

Is COVID-19 the same as SARS?

नाही. ज्या विषाणूमुळे COVID-19 होतो आणि ज्या विषाणूमुळे 2003 मध्ये सार्स (SARS) या रोगाचा उद्रेक झाला होता, हे दोन्ही जरी जनुकीयदृष्ट्या एकमेकांशी संबंधित असले, तरीही त्यांच्यामुळे होणारे रोग हे काहीसे वेगळे आहेत. सार्स हा अतिशय घातक होता परंतु COVID-19 पेक्षा खूप कमी संसर्गजन्य होता. 2003 नंतर जगभरात कोठेही सार्सचा उद्रेक झाल्याचे आढळलेले नाही.

English Information Source:   https://who.int

Marathi Translation: http://techliebe.com/category/health/corona/

Leave a comment