कोरोना प्रश्नोत्तरे – भाग: 2


COVID-19 कसा प्रसारित होतो?

How does COVID-19 spread?

कोरोना विषाणूग्रस्त असलेल्या व्यक्तीमुळे लोकांमध्ये COVID-19 प्रसारित होऊ शकतो. जेव्हा COVID-19 रोगाने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्याच्या नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडणाऱ्या लहान-लहान थेंबांद्वारे त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा रोग प्रसारित होऊ शकतो.

हे थेंब त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या वस्तू आणि पृष्ठभागांवर पडतात. या वस्तूंना किंवा पृष्ठ्भागांना स्पर्श झाल्यावर आणि मग पुन्हा डोळ्यांना, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यावर इतर व्यक्तींना COVID-19 चा संसर्ग होऊ शकतो.

COVID-19 चा संसर्ग झालेली व्यक्ती खोकली आणि शिंकल्यावर उडालेले थेंब जर एखाद्या व्यक्तीच्या श्वासावाटे शरीरात गेले तर त्या व्यक्तीलाही COVID-19 चा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच आजारी व्यक्तीपासून 1 मीटर (3 फूट) हून अधिक अंतर राखणे महत्त्वाचे आहे.

COVID-19 कोणकोणत्या मार्गांनी प्रसारित होऊ शकतो यावर केल्या जाणाऱ्या संशोधनाचे WHO द्वारे मूल्यांकन केले जात आहे आणि नवीन शोध त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील.

COVID-19 ways of spread and Care to be taken.

COVID-19 संक्रमणास कारक असलेला विषाणू हवेतून प्रसारित होऊ शकतो का?

Can the virus that causes COVID-19 be transmitted through the air?

आतापर्यंत झालेल्या अभ्यासांनुसार, COVID-19 संक्रमणास कारक असलेला विषाणू हवेतून प्रसारित होण्याऐवजी मुख्यत्वेकरून श्वसनमार्गे शरीरात जाणाऱ्या सूक्ष्म थेंबांच्या माध्यमातून प्रसारित होतो.

कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातूनही COVID-19 प्रसारित होऊ शकतो का?

Can COVID-19 be caught from a person who has no symptoms?

मुख्यत्वेकरून, एखाद्या व्यक्तीच्या खोकण्यातून हवेत पसरलेल्या सूक्ष्म थेंबांच्या माध्यमातून हा रोग प्रसारित होतो. कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून COVID-19 ची लागण होण्याचा धोका अतिशय कमी आहे.

असे असले तरीही, COVID-19 असलेल्या अनेक लोकांना केवळ सौम्य लक्षणेही दिसून येतात. रोगाच्या प्रारंभिक स्थितीमध्ये प्रामुख्याने असे घडत असल्याचे आढळते. त्यामुळे उदाहरणार्थ, एखादी अशी व्यक्ती जिला ती आजारी आहे असे वाटत नाही परंतु थोडासा खोकला आहे अशा व्यक्तीमुळे COVID-19 चे संक्रमण होण्याची शक्यता आहे.

COVID-19 च्या प्रसारित होण्याच्या कालावधी संदर्भात केल्या जाणाऱ्या संशोधनाचे WHO द्वारे मूल्यांकन केले जात आहे आणि नवीन शोध त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील.

English Source:   https://who.int

Marathi Translation: http://techliebe.com/category/health/corona/

Leave a comment