प्रश्न: माझे फेसबुक मित्र माझ्या खात्यावर “Game Requests”/गेम रिक्वेस्ट [खेळ विनंत्या] पाठवतात ज्या गेम मी खेळत नाही. मला त्यांचा काही उपयोग नाही आणि ते कसे हटवावे ते समजत नाही. कृपया काही मदत करू शकाल का? साधे उत्तर: हो, नक्कीच. लक्षात ठेवा कि सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला “फेसबुक कम्युनिटी” मध्ये मिळू शकतात. सविस्तर उत्तर: तुम्ही फेसबुकवर कशाप्रकारे लॉग-ईन केले आहे यावर ते अवलंबून आहे. जोपर्यंत तुम्ही फेसबुक “डेस्कटॉप मोड” मध्ये पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन/सूचनेच्या ठिकाणी “x” चिन्ह दिसणार नाही. [गुगल क्रोम/इंटरनेट एक्स्प्लोरर/मोझीला ब्राऊझर यातून तुम्ही फेसबुकवर लॉग-ईन करताना “डेस्कटॉप मोड” निवडू शकता.] गेम रिक्वेस्ट्स हटविण्यासाठी तुम्हाला नोटीफिकेशन पाहताना उजव्या कोपऱ्याला “x” असे चिन्ह दिसेल. याने फक्त गेम रिक्वेस्ट्सचे नोटिफिकेशन येणे थांबेल पण कोणीतरी तुम्हाला या रिक्वेस्ट्स पाठवतच राहतील. पण तुम्हाला त्या गेम रिक्वेस्ट येणेच थांबायचे असेल तर तुम्हाला गेम ब्लॉक करावी लागेल. (जसे तुम्ही अनोळखी मित्रांना ब्लॉक करता तसे :D) जालीम उपाय: जर तुम्हाला गेम्स ब्लॉक करायच्या असतील त्यासाठीचे उपाय: उपाय # 1 [सरळ-सोट मार्ग : आपण फेसबुक खातेदार आहोत, आपले हक्क वापरू :D] 1. “सेटिंग्ज/Setting” बटणावर क्लिक करा. (होमपेजच्या उजव्या कोपऱ्याला वरती बर्फाच्या खड्यासारखे किंवा गिअरसारखे दिसते.) 2. पेजच्या डाव्या बाजूला, “ब्लॉकिंग” बटण शोधा. 3. आता ते तुम्हाला “ब्लॉकिंग व्यवस्थापन/Manage Blocking” पृष्ठ दर्शवेल, ज्यामध्ये खालील 5 विभाग सूचीत दिसतील. (प्रतिबंधित यादी[Restricted List], अवरोधित वापरकर्ते[Block users], आमंत्रणे अवरोधित करा[Block app invites], कार्यक्रम आमंत्रणे अवरोधित करा[Block event invites], अॅप्स अवरोधित करा/[Block Apps]) (“Block apps invites” आणि “Block apps” यावर लक्ष केंद्रित करा) 4. “Block apps invites” विभागात, तुम्हाला जो मित्र नेहमी गेम्स रिक्वेस्ट पाठवतो त्याचे नाव प्रविष्ट करा आणि एंटर दाबा आणि मग त्याकडून येणाऱ्या सर्व अॅप/गेम रिक्वेस्ट फेसबुक थांबवेल. (तुम्ही त्या व्यक्तीबरोबर मित्र राहणारच आहात फक्त तुम्हाला कोणतीही अॅप रिक्वेस्ट पाठवण्यापासून रोखणार आहात.) 5. मित्राचे नाव प्रविष्ट करावेसे वाटत नसेल तर [कधी-कधी ‘त्या’ फेसबुक मित्राचे नाव आठवत नाही, पण गेमचे नाव तर माहित असतेच न..] मग गेम चे नाव “Block apps” विभागात प्रविष्ट करा म्हणजे कुणीच तुम्हाला त्या गेमची रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. [डायरेक्ट शॉट, जालीम उपाय :D] उपाय # 2 [आडवळणाने मजा घेत, टी.पी. करत..] 1. पेजच्या वरच्या बाजूवरील “होम” बटणावर फेसबुक होमपेज ला जा. 2. स्क्रीनच्या डाव्या बाजूवर “App” शब्द कुठे दिसतोय का बघा. [चष्मीश असाल तर चष्मा घालून बघा :)] 3. “Games”/खेळ, लाल रंगाचा पत्ता बदाम [लव्ह] असलेला ठोकळा दिसेल त्यावर क्लिक करा. (तो बदामी ठोकळा तुम्हाला “Apps Center”/अॅप विभाग असे म्हणवणाऱ्या पानाकडे घेऊन जाईल) 4. आता परत “Apps Center” पानाच्या डाव्या बाजूला, “Requests”/विनंत्या बटण दिसेपर्यंत स्क्रोल करा आणि दिसले कि त्यावर क्लिक करा. 5.पानाच्या मध्यभागी, सगळ्या गेम रिक्वेस्ट दिसू लागतील (कुणी पाठवल्या असल्या तर, नाहीतर मोकळंच दिसेल :D) 6. प्रत्येक गेम रिक्वेस्टवर दोन पर्याय दिसतील “Play Now”/आत्ता खेळा आणि/किंवा आपल्या आवडीचे “X” बटण दिसेल. –> प्रत्येक गेम रिक्वेस्टच्या चौकटीत ती तुम्हाला कुणी पाठवली ते दिलेले असेल. –> एकाच गेमच्या विविध व्यक्तींनी पाठविलेल्या विनंत्याही दिसतील –>उदाहरणार्थ: “मित्र अमुक, मित्र तमुक ने तुम्हाला “Criminal Case”/क्रिमिनल केस [फौजदारी खटला :D] खेळून पाहायला आमंत्रित केले आहे. 7. गेम रिक्वेस्ट रद्द करण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी “X” बटणावर क्लिक करा, आणि मग एक संदेश प्रकट होईल त्यात निवडण्यासाठीचे दोन पर्याय दिसतील. [खालील उदाहरण पहा] “क्रिमिनल केसच्या 25 रिक्वेस्ट्स/विनंत्या तुम्ही लपवल्या आहेत” क्रिमिनल केसला अवरोधित करायचे? अमुक मित्राकडील सर्व विनंत्या लपवायच्या? लक्षात घ्या: –> जेव्हा तुम्ही गेम ब्लॉक करता, तेव्हा त्या विशिष्ट गेमसाठी कोणीही तुम्हाला विनंती पाठवू शकणार नाही. [कटकट मिटली :D] –> जर तुम्ही विशिष्ट मित्राने पाठविलेल्या सर्व विनंत्या “Ignore”/दुर्लक्षित करत असाल तर, तुमचे इतर मित्र त्या गेमसाठी विनंत्या तुम्हाला पाठवू शकतात म्हणजेच विनंत्या दुर्लक्षित केल्या तर गेम ब्लॉक होणार नाही. [गेमच्या मुळावरच घाव घालायचा कि नाही हा तुमचा प्रश्न आहे :D] तसेच, जर तुम्ही मित्रांच्या विनंत्या दुर्लक्षित केल्या तर तुमचे मित्र ब्लॉक होणार नाहीत त्यामुळे काळजी करू नका. 8. बाकीच्या गेम्स साठी 6 व्या आणि 7 व्या पायरीची पुनरावृत्ती करा. टीप: हे दोन उपाय साधारण कुठेही सापडणारे आहेत आणि तुमचा गेम्स बाबतीतला प्रश्न सोडविण्यासाठी हेच फक्त उपाय आहेत, जोपर्यंत तुम्ही तुमचे खाते निष्क्रिय [Deactivate] करत नाही तोपर्यंत 😀 जशा गेम विनंत्या लपविता येतात तशाच पद्धतीने कार्यक्रम विनंत्या आणि इतर गोष्टी “Manage Blocking” ब्लॉकिंग व्यवस्थापनातून करता येतात. इंग्रजीत वाचा: https://www.facebook.com/help/community/question/?id=10151722782437176 इंग्रजीत बघा: https://www.facebook.com/video/video.php?v=474308233162