१९६५ च्या पाकिस्तान युद्धात खेमकरण सेक्टरमध्ये घमासान लढाई चालू होती. पाकिस्तानी लष्कराला अमेरिकेने दिलेल्या पॅटर्न रणगाड्यांचा कोण अभिमान ! पाकिस्तानच कशाला.. हा रणगाडा अभेद्य असल्याचा अमेरिकेचाही दावा होता. खेमकरण क्षेत्र हा तसा चिखलयुक्त दलदलीचा भाग. भारतीय सैन्याला त्यांच्या प्रमुखाने धोका पत्करून पुढे जाण्याचा आदेश दिला. अनेक पॅटर्न रणगाडेही जागेवर खिळवून ठेवून त्यांना नष्ट करण्याचा पराक्रमही त्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केला. त्यानंतर १९६९ मध्ये, पूर्व विभागाचा अधिभार घेऊन याच बहाद्दराने […]