1904 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जन्मलेल्या जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचे सर्वांना भावणारे ‘जेआरडी’ हे टोपण नाव होते. फ्रान्स, जपान आणि इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जेआरडी यांनी एक वर्षासाठी फ्रान्सच्या लष्करी प्रशिक्षणाचा अनुभवही घेतला होता. त्यांना फ्रान्स लष्कर अथवा केंब्रिजमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा होती; परंतु 1925 साली वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना वडिलांनी भारतात बोलावून घेतल्याने त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपुरे राहिले. त्याची बोच त्यांना आयुष्यभर होती. परंतु अपरिचित असलेल्या देशामध्ये […]