गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला 1912 या वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर कोणत्याही भारतीय लेखकास हा मान मिळालेला नाही. यावरूनच रवींद्रनाथ टागोर यांचे मोठेपण सिद्ध होते. टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. गुरुदेव टागोर यांना चित्रकला, शिक्षण आदी क्षेत्रांतही चांगली गती होती, जाण होती आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कार्येही केली. टागोर यांनी काव्यप्रकार हाताळण्याबरोबरच ‘नौकाडूबी‘, ‘गोटा‘ यांसारख्या कादंबऱ्या, ग्रंथ, नाट्यलेखन, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र आदी. […]