“Transfer of Power Agreement”-सत्ता हस्तांतरण करार


खरंच भारत स्वतंत्र आहे का? जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न…..

“Transfer of Power Agreement” (सत्ता हस्तांतरण करार) चा अर्थ जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.

        14 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले नाही, तर सत्ता हस्तांतरणाचा करार झाला होता.  सत्ता हस्तांतरण करार (Transfer of Power Agreement )  म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याचा करार ! हा इतका घातकी करार आहे कि इंग्रजांनी 1615 ते 1857 पर्यंत केलेले सर्व 565 करार जरी एकत्र केले तरी त्यापेक्षा हा करार जास्तच घातकी आहे. 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री जे काही घडले ते भारताचे स्वातंत्र्य नव्हते, पंडित नेहरू आणि लॉर्ड(?) माउंट बेटन या दोघांमध्ये झालेला सत्ता हस्तांतरणाचा करार होता. Transfer of Power (सत्ता हस्तांतरण) आणि Independence (स्वातंत्र्य) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि हे सत्तेचे हस्तांतरण कसे होत असते? तुम्ही पाहिले असेल कि, एका पक्षाचे सरकार आहे, ते निवडणुकीत हरले कि मग दुसरा पक्ष सत्तेवर येतो, दुसऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान म्हणून जेव्हा शपथ घेतो तेव्हा, शपथ घेतल्यावर तो एका रजिस्टरवर सही करतो, आपल्यापैकी बरेच जणांनी पाहिले असेल कि, होणारे पंतप्रधान ज्या रजिस्टरवर सही करतो त्याला सत्ता हस्तांतरण पुस्तक असे म्हणतात आणि त्यावर सही केल्यावर जुने पंतप्रधान नवीन पंतप्रधानांकडे सत्ता सोपवितात आणि बाहेर निघून जातात.

Transfer of power agreement

        हेच नाट्य घडले होते….  14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री. लॉर्ड(?) माउंट बेटनने त्याच्याकडील सत्ता पंडित नेहरूंच्या हाती दिली, आणि आपण म्हणू लागलो कि स्वातंत्र्य मिळाले. कसले हे स्वातंत्र्य ? इंग्रजांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ काय होता? आणि आपल्यासाठी स्वातंत्र्य/स्वराज्याचा अर्थ काय होता? हे सुद्धा समजून घ्या…! इंग्रज म्हणायचे आम्ही स्वातंत्र्य दिले, म्हणजे कि आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे म्हणजे तुम्ही काही काळ ही सत्ता सांभाळा, जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही पुन्हा येऊ… ही इंग्रजांची interpretation (व्याख्या) होती. आणि हिंदुस्तानी लोकांची व्याख्या काय होती कि आम्ही स्वातंत्र्य मिळविले…! आणि या करारानुसारच भारताचे दोन तुकडे पाडले गेले, आणि भारत व पाकिस्तान नावाचे दोन Dominion States बनविले गेले. Dominion State चा अर्थ मराठीत ‘मोठ्या राज्याचा अधीन असणारे लहान राज्य’ असा होतो, हा शाब्दिक अर्थ आहे आणि भारताच्या बाबतीत हा अर्थ खराच आहे.  इंग्रजीमध्ये याचा एक अर्थ असा आहे कि  “One of the self-governing nations in the British Commonwealth” आणि दुसरा  “Dominance or power through legal authority “.  Dominion State आणि Independent Nation मध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आहे. सरळ अर्थ असा आहे कि, अजूनही आपण (भारत आणि पाकिस्तान) इंग्रजांच्या अधीन आहोत. दुःख तर याचे होते कि, त्यावेळच्या लोभी नेत्यांनी विचार न करता, समजून न घेता, या कराराला मान्य केले किंवा असे म्हणू शकतो कि जाणून-बुजून स्वीकार केले, आणि हे जे तथाकथित स्वातंत्र्य मिळाले, त्याचा कायदा इंग्रजांच्या संसदेने बनविला आणि त्याचे नाव ठेवले गेले ‘Indian Independence Act’ म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा !

        अशा दुष्ट नाटकी पद्धतीने जर या देशाला स्वतंत्र केले गेले असेल तर मग ते स्वातंत्र्य, स्वातंत्र्य कसले? आणि म्हणूनच यामुळे महात्मा गांधीजी 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री दिल्ली मध्ये आले नव्हते. ते नोआखाली मध्ये होते. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गांधीजींना बोलाविण्यास गेले होते कि, बापू चला तुम्ही.. पण गांधीजींनी नकार दिला. का? गांधीजी म्हणाले होते कि, मी मानतच नाही कि, कोणते स्वातंत्र्य येत आहे म्हणून. आणि गांधीजींनी स्पष्टपणे सांगितले होते कि हे स्वातंत्र्य येत नाही, हा तर सत्ता हस्तांतरणाचा करार होत आहे आणि गांधीजींनी नोआखालीमधून पत्रक प्रकाशित केले होते. त्या पत्रकामधले पहिले वाक्य होते कि, मी हिंदुस्थानामधल्या करोडो लोकांना संदेश देऊ इच्छितो कि, हे जे तथाकथित स्वातंत्र्य (So Called Freedom) येत आहे ते मी आणलेले नाही. ही सत्तेवरील लोभी माणसे सत्ता हस्तांतरणाच्या चक्रव्यूहात फसून हे स्वातंत्र्य घेऊन आले आहेत. मला असे अजिबात वाटत नाही कि, या देशात कोणते स्वातंत्र्य आले आहे. आणि 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री गांधीजी दिल्लीमध्ये नव्हते, नोआखाली मध्ये होते.

        म्हणजे भारतीय राजनीतीचा सगळ्यात मोठा आद्यप्रवर्तक, ज्याने स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला होता ती व्यक्ती 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री दिल्लीमध्ये उपस्थित नव्हती. का? याचा अर्थ असा होतो कि गांधीजी याच्याशी सहमत नव्हते. (नोआखाली मधील दंगल हे एक फक्त निमित्त होते, खरे कारण तर हे सत्ता हस्तांतरणाचेच होते) आणि 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री जे काय घडले ते स्वातंत्र्य नव्हते ….  पंडित नेहरु आणि इंग्रज सरकार या दोघांमध्ये सत्ता हस्तांतरणाचा करार लागू झाला होता. आता नियम/अटींबद्दल बोलूयात, सर्व इथे सांगणे शक्य नाही पण काही महत्वपूर्ण अटींचा नक्कीच उल्लेख करेन, ज्याबद्दल सामान्य भारतीय जनतेला माहिती आहे, त्यांची ओळख आहे.

        या कराराच्या अटींनुसार आपण आजही इंग्रजांच्या अधीन आहोत. आपण एक शब्द ऐकला असेल Commonwealth Nations. काही वर्षांपूर्वी दिल्ली मध्ये Commonwealth Game झाल्या होत्या तुम्हाला आठवत असेल त्यामध्ये घोटाळा पण झाला होता. Commonwealth म्हणजे समान संपत्ती ! कुणाची समान संपत्ती? ब्रिटनच्या राणीची समान संपत्ती | तुम्हाला माहिती आहे, ब्रिटनची महाराणी आजही भारताची नागरिक आहे आणि आपल्यासारख्याच 71 देशांची ती नागरिक आहे. Commonwealth मध्ये 71 देश आहेत आणि या सर्व देशांमध्ये जाण्यासाठी ब्रिटनच्या महाराणीला व्हिसाची गरज पडत नाही कारण ती तिच्याच देशांमध्ये जात आहे, पण भारताच्या पंतप्रधानांना व राष्ट्रपतींनासुद्धा ब्रिटनमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज पडते, कारण ते दुसऱ्या देशामध्ये जात आहेत. याचा अर्थ असा होतो कि, ब्रिटनची महाराणी भारताची नागरिक आहे किंवा भारत आजही ब्रिटनच्या सत्तेखाली आहे म्हणून ब्रिटनच्या राणीला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज पडत नाही. जर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत तर मग 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ही कहाणी खोटीच आहे.

–> Commonwealth Nations मध्ये आपली जी नोंद आहे ती Dominion State च्या रुपामध्ये आहे. या देशाचा एक प्रोटोकॉल आहे कि नवीन राष्ट्रपती निवडले गेले कि 21 तोफांची सलामी द्यायची, त्यांच्याशिवाय इतर कुणालाही नाही !  पण ब्रिटनची महाराणी आली तर तिलाही 21 तोफांची सलामी दिली जाते, याचा अर्थ काय आहे?  आणि मागच्यावेळी जेव्हा ब्रिटनची महाराणी जेव्हा इथे आली होती तेव्हा एक निमंत्रण छापले गेले होते त्यावर सर्वात वर नाव ब्रिटनच्या राणीचे होते आणि त्याखाली भारताच्या राष्ट्रपतींचे, म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती राष्ट्राचे प्रथम नागरिक नाहीत ! ही आहे राजकीय गुलामी ! आपण कसे मान्य करायचे कि आपण एका स्वतंत्र देशात राहत आहोत? एक शब्द आपण ऐकला असेल High Commission, इंग्रजांचा एक गुलाम देश दुसऱ्या गुलाम देशामध्ये हे उघडतो, पण याला Embassy असे म्हटले जात नाही.

–> एक मानसिक गुलामगिरीचे उदाहरण ही पहा! आपल्या येथील वृत्तपत्रांमध्ये आपण पाहत असाल कि याप्रकारचे शब्दप्रयोग वापरले जातात: (ब्रिटनची महाराणी नाही) महाराणी एलिझाबेथ, (ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स नाही) प्रिन्स चार्ल्स, (ब्रिटनची प्रिन्सेस नाही) प्रिन्सेस डायना  (आता तर त्या नाहीत), आणि आता तर एक प्रिन्स विलियम्स पण आले आहेत (प्रिन्स जॉर्ज सुद्धा)…

–> भारताचे नाव INDIA राहील आणि जगभर ते इंडिया असेच प्रचारित केले जाईल, आणि सरकारी दस्तऐवजांमध्येही इंडिया नावानेच संबोधित केले जाईल. तुमच्या-आमच्यासाठी भारत आहे पण दस्तावेजांमध्ये इंडिया आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये लिहिले गेले आहे कि, “India that is Bharat ” पण खरे तर ते असे असायला हवे  “Bharat that was India ” परंतु आपल्या देशाचे दुर्भाग्य कि, भारताच्या जागी इंडिया झाले. करारामधील अटींपैकी ही एक अट आहे. आपण भारताचे लोक जे इंडिया म्हणतो तो कुठूनही भारत नाही. काही दिवसांपूर्वी मी एक लेख वाचत होतो, त्यामध्ये त्या व्यक्तीने असे लिहिले होते कि, इंडियाचे नाव बदलून भारत ठेवले तर देशामध्ये आश्चर्यजनक बदल घडतील आणि हा देश विश्वाची मोठी शक्ती बनेल, आता त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये किती सच्चेपणा आहे ते मला माहित नाही, पण जोपर्यंत भारत ‘भारत’ होता, तोपर्यंत तो जगात सगळ्यांच्या पुढे होता, जेव्हापासून भारताचा ‘इंडिया’ झाला तेव्हापासून तो मागे पडत आहे.

–> पुढील 50 वर्षे भारताच्या संसदेमध्ये वंदे मातरम गायले जाणार नाही, म्हणजेच 1997 पर्यंत ! 1997 मध्ये माजी पंतप्रधान कै. चंद्रशेखर यांनी या मुद्द्याला संसदेत मांडले आणि पहिल्यांदाच या तथाकथित देशाच्या संसदेमध्ये वंदे मातरम गायले गेले. 50 वर्षे गायले गेले नाही कारण, ही त्या करारातील अटींपैकी एक अट आहे. आणि वंदे मातरम गीतावरून मुसलमान नागरिकांमध्ये जो भ्रम पसरवला गेला तो इंग्रजांच्या निर्देशांनुसारच होता. या गीतामध्ये असे काहीच समस्या उत्पन्न करणारे नाही कि जे मुसलमान नागरिकांचे मन दुखावेल. समस्या उत्पन्न करणारे तर जन-गण-मन आहे ज्यामध्ये एका व्यक्तीला भारत भाग्यविधाता म्हणजेच भारताच्या प्रत्यके व्यक्तीला भगवान/देवापेक्षा सरस मानले आहे.

–> या कराराच्या अटींनुसार सुभाषचंद्र बोस यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत इंग्रजांच्या हवाली करायचे होते. हेच कारण आहे कि, सुभाषचंद्र बोस अजूनही आपल्या देशासाठी हरवलेलेच आहेत, आणि कुठे मृत पावले हे आपल्याला माहित नाही. वेळोवेळी अनेक अफवा पसरल्या पण सुभाष चंद्र बोस यांचा पत्ता लागलेला नाही, आणि त्यांचा शोध घेण्यामध्ये कुणी रसही दाखविला नाही. (Wiki: In August 2013 , the prime minister’s office rejected an RTI petition requesting the release of secret files on Bose, said to contain letters written by his wife Emilie Schenkl and daughter Anita Bose citing reasons that it would prejudicially affect relations with foreign countries) याचा अर्थ असा, कि भारताचा महान स्वतंत्रता सेनानी आपल्यासाठी ‘अज्ञात’ झाला. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना बनवली होती हे तर आपल्याला माहिती असेल, पण महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरे महायुद्ध चालू असताना 1942 मध्ये बनवली होती, आणि या कामासाठी त्यांनी जराम आणि जपानी लोकांची मदत घेतली होती, जे कि इंग्रजांचे शत्रू होते आणि याच आझाद हिंद सेनेने इंग्रजांना सगळ्यात जास्त नुकसान पोहोचविले होते. जर्मनीचा हिटलर आणि इंग्लंडचे एटली आणि चर्चिल यांच्या व्यक्तिगत वादांवरून दुसरे महायुद्ध झाले होते, दोन्ही देश एकमेकांचे कट्टर शत्रू होते. एका शत्रूची मदत घेऊन सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले होते. एक तर इंग्रज महायुद्धात गर्क होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना सुभाषचंद्र बोसांमुळे संकटांचा सामना करावा लागत होता. म्हणून ते सुभाषचंद्र बोसांचे शत्रू होते.

 Troops of Azad Hind Fauj

–> या करारातील अटींनुसार भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, अशफाकुल्लाह, रामप्रसाद विस्मिल यांसारखे क्रांतिकारक आतंकवादी होते आणि हेच आपल्या पाठ्यक्रमात बराच काळ शिकविले जात होते, काही लोकांनी या वर केस केल्यामुळे न्यायलयाने हे बदलण्याचा आदेश दिला.

–> तुम्ही भारताच्या सर्व मोठ्या रेल्वे स्थानकांवर पुस्तकांचे एक दुकान पाहत असाल, “व्हीलर बुक स्टोअर” हे या करारातील अटींनुसारच आहे. हा व्हीलर कोण होता? हा व्हीलर सगळ्यात मोठा अत्याचारी होता. याने या देशातील हजारो आई, बहिणी आणि मुलींवर बलात्कार केले होते. यानेच शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त गोळ्या चालविल्या होत्या. 1857 च्या क्रांतीनंतर कानपूर जवळील बिठूर मध्ये व्हीलर आणि नील नावाच्या दोन इंग्रजांनी सर्व 24 हजार लोकांना (जन्मलेले अर्भक असो व मृत्युशय्येवर असणारी म्हातारी व्यक्ती असो) सर्वांनाच जीवे मारले होते. या व्हीलरच्या नावाने इंग्लंडमध्ये एक एजन्सी सुरु झाली होती तीच भारतामध्ये आली. भारत स्वतंत्र झाल्यावर ते बंद व्हायला हवे होते, कमीत-कमी नाव तरी बदलयला हवे होते, पण तेही बदलले गेले नाही कारण ते या करारामध्ये आहे.

–>  या करारातील अटींनुसार इंग्रज देश सोडून जातील परंतु या देशातील कोणताही कायदा कोणत्याही क्षेत्रामधील असो बदलला जाणार नाही. म्हणून इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत देशातील 34735 कायदे जसेच्या तसे चालू आहेत. Indian Police Act, Indian Civil Services Act (आता याचे नाव Indian Civil Administrative Act), Indian Penal Code (Ireland मध्ये पण IPC चालतो, आणि Ireland मध्ये “I” चा अर्थ Irish आहे, तोच भारताच्या IPC मध्ये “I” चा अर्थ Indian बाकी सर्व माहिती/कंटेंट एकच आहे, कॉमा किंवा फुलस्टॉपचा पण फरक नाहीये 🙂  Indian Citizenship Act, Indian Advocates Act, Indian Education Act, Land Acquisition Act, Criminal Procedure Act, Indian Evidence Act, Indian Income Tax Act, Indian Forest Act, Indian Agricultural Price Commission Act  सगळेच्या सगळेच आज ही तसेच चालू आहेत फुल स्टॉप आणि कॉमा न बदलता…!!

–> या करारानुसार इंग्रजांनी बनविलेल्या इमारती जशाच्या तशा ठेवल्या जातील. शहराचे नावं, रस्त्यांची नावे सर्व जसेच्या तसेच ठेवले जाईल. आज देशाचे संसद भवन, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, राष्ट्रपती भवन, किती नावे घ्यायची.. सर्व जसेच्या तसे उभे आहेत, आणि आपल्याला चिडवत आहेत. लॉर्ड(?) डलहौसीच्या नावावरून डलहौसी शहर आहे, वास्को दि गामा नावाचे शहर आहे (तो तर पोर्तुगीज होता) [ तो भरकटलेला असताना आपल्याच खलाशी/व्यापाऱ्यांनी त्याला वाट दाखविली होती] रिपन रोड, कर्जन रोड, मेयो रोड, बेंटिक रोड , (पटना मधील) फ्रेजर रोड, बेली रोड अशा हजारो इमारती आणि रस्ते आहेत, सर्वांची नावे अजूनही तीच आणि तशीच आहेत. तुम्ही पण तुमच्या शहरामध्ये पाहिले असेल कि, आजही कोणत्या न कोणत्या इमारती, रस्त्यांना त्यांची नावे असतील. गुजरातमध्ये एक शहर आहे, ‘सुरत’, या सुरत शहरातील एका इमारतीचे नाव आहे ‘कूपर व्हिला’. इंग्रजांना जेव्हा जहांगीर ने व्यापाराचा परवाना दिला होता तेव्हा सर्वप्रथम ते सुरत शहरात आले होते आणि हि इमारत त्यांनी तयार केली होती. हा गुलामीचा पहिला अध्याय सुरतमध्ये अजूनही जशाचा तसा उभा आहे.

–> आपल्या इथे शिक्षण व्यवस्था इंग्रजांची आहे कारण तसे या करारात लिहिलेले आहे, आणि मजेदार गोष्ट म्हणजे, आपल्या इथे एक शिक्षण व्यवस्था आहे आणि त्यांनी त्यांच्या इथे वेगळी शिक्षण व्यवस्था चालवली आहे. आपल्या इथे शिक्षणामध्ये डिग्री(पदवी) ला महत्व आहे [इकडचे काही लोक सुशिक्षित असून, पदवीधर/द्विपदवीधर असूनही मूर्खासारखे वागत असतात] त्यांच्या इथे याच्या बरोबर उलट आहे. माझे एखाद्या विषयाचे ज्ञान उत्तम आहे आणि मी त्यात काही शोध लावला तर भारतात विचारले जाते कि तुमच्या कडे कोणती डिग्री आहे ? आणि जर नसेल तर मग तुमच्या शोधाला आणि ज्ञानाला काडीचीही किंमत नाही. पण त्यांच्याकडे असे नाहीये, जर तुमच्याकडे एखाद्या विषयाचे ज्ञान आहे, पण डिग्री नाहीये, तर काही समस्या नाही, तुम्हाला प्रोत्साहित केले जाईल. नोबेल पुरस्कार मिळविण्यासाठी तुम्हाला डिग्रीची आवश्यकता नसते. आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला डिग्रीमध्ये बांधून टाकले आहे जे कि आजही तसेच चालू आहे.(खेळण्याच्या वयात लहान मुलांनाही स्पर्धांना/परीक्षांना तोंड द्यावे लागतेय) हे जे 30-35 गुण मिळवले म्हणजे ‘पास’ ही त्याच शिक्षण व्यवस्थेच देणगी आहे, याचा अर्थ असा कि भलेही 70 मार्कांमध्ये तुम्ही फेल आहात, पण 30 मार्क/गुण मिळविले तर पास आहात, आणि अशा शिक्षण व्यवस्थेतून फक्त मूर्ख गाढवंच निर्माण होतील आणि हेच इंग्रजांना हवे होते. तुम्ही पाहिले असेल कि आपल्या देशामध्ये एक विषय चालतो ज्याचे नाव आहे ‘Anthropology’. तुम्हाला माहिती आहे का या विषयामध्ये काय शिकविले जाते? यामध्ये गुलाम लोकांच्या मानसिक अवस्थेबद्दल शिकविले जाते, आणि हा विषय इंग्रजांनी या देशात सुरु केला होता आणि स्वातंत्र्याची 66  वर्षे होऊनही या देशाच्या महाविद्यालयांमध्ये तो शिकविला जातो आणि सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षांमध्येही हा चालतो.

–> या करारातील अटींनुसार आपल्या देशामध्ये आयुर्वेदाला कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, म्हणजे आपल्या देशातील विद्या आपल्याच देशामध्ये संपून जाईल असा त्यांचा डाव होता. आयुर्वेदाला नष्ट करण्याचे भरपूर प्रयत्न इंग्रजांनी केले पण ते नष्ट करू शकले नाहीत. (हजारो वर्षांपूर्वीचे वेद आणि त्यातील ज्ञान नष्ट/निरुपयोगी झालेले नाही तर हे काय करू शकणार..!) जगभरात जेवढ्या उपचार पद्धती आहेत त्यामध्ये आजारी पडल्यानंतरच तुमच्यावर इलाज करता येतो, आयुर्वेद एक अशी विद्या आहे कि ज्यामध्ये म्ह्टले जाते कि तुम्ही आजारी पडूच नका ! तुम्हाला मी एक सत्य घटना सांगतो, जॉर्ज वॉशिंग्टन जो अमेरिकेचा पहिला राष्ट्रपती होता, तो डिसेंबर 1799 मध्ये आजारी पडला आणि जेव्हा त्याचा आजार ठीक होत नव्हता तेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते कि, यांच्या शरीरातील रक्त दुषित झाले आहे ते काढून टाकल्यानंतर हा आजार बरा होईल आणि त्यांच्या हातांच्या दोन्ही नसा डॉक्टरांनी कापून टाकल्या आणि अतिरक्तस्त्रावामुळे जॉर्ज वॉशिंग्टन मरून गेला. [The bleedings inflicted by Washington’s doctors hastened his end. Some 80 ounces of blood were removed in 12 hours 2 (this is .63 gallons, or about 35% of all the blood in his body] ही घटना 1799 ची आहे आणि 1780 मध्ये एक इंग्रज भारतामध्ये आला होता आणि येथून प्लास्टिक सर्जरी शिकून गेला होता. सांगण्याचे तात्पर्य असे कि, आपल्या देशातील चिकित्सा विज्ञान त्यावेळीही एवढे विकसित होते, आणि हे सर्व आयुर्वेदामुळे होते, आणि त्याच आयुर्वेदाचा सरकारने कडेलोट चालविला आहे.

–> या करारानुसार, आपल्या देशामधील गुरुकुल संस्कृतीला अजिबात प्रोत्साहन दिले जाणार नाही. आपल्या देशामधील तंत्रज्ञान या गुरुकुलामुळेच होते. इंग्रजांनी सगळ्यात प्रथम या देशातील गुरुकुल परंपरेला तोडले, इथे मी 2 फेब्रुवारी 1835 मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये लॉर्ड(?) मेकॉलेने दिलेल्या भाषणातील एक भाग सांगू इच्छितो, तो म्हणाला होता, “I have traveled across the length and breadth of India and have not seen one person who is a beggar, who is a thief, such wealth I have seen in this country, such high moral values, people of such caliber, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truly dominated nation”  याचा अर्थ असा होतो कि, “मी संपूर्ण भारतभर फिरलो, पण कुठेही मला अशी व्यक्ती दिसली नाही कि, जी भिकारी, चोर आहे; अशी श्रीमंती या देशामध्ये आहे, अशी उच्च नैतिक मूल्ये, अशी मोठ्या मनाची माणसे इथे आहेत, त्यामुळे मला वाटते कि, आपण हा देश तोपर्यंत जिंकून घेऊ शकत नाही, जोपर्यंत आपण या देशाचा मणका मोडत नाही, आणि तो म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा.. आणि म्हणूनच मी असे प्रस्तुत करतो कि, आपण तिची(भारताची) जुनी आणि प्राचीन शिक्षण पद्धती बदलुयात, तिची संस्कृती बदलुयात, भारतीय असा विचार करतात कि पाश्चिमात्य आणि इंग्रजी चांगले आहे आणि त्यांच्यापेक्षा मोठे आहेत….  भारतीय त्यांचा स्वतःचा आदर गमावतील, त्यांची स्वतःची संस्कृती गमावतील आणि आपल्याला जे हवे आहे तसे ते होतील, ‘एक गुलाम(मांडलिक) राष्ट्र‘ “… गुरुकुलचा अर्थ आपल्याला असा वाटतो कि, आपण केवळ वेद, उपनिषद समजतो जो कि आपला मुर्खपणा आहे. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर हे जे गुरुकुल होते ते सर्वच खरोखर “Higher Learning Institute” होते.

–> या करारामध्ये अजून एक खास गोष्ट आहे. यामध्ये सांगितले गेले आहे कि, आपल्या देशातील (भारतामधील) न्यायालयांमध्ये असा एखादा खटला आला कि ज्यावर या देशामध्ये कोणताही कायदा नाही तर त्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसेल तर करारामध्ये स्वच्छ/स्पष्ट लिहिले आहे कि, त्याचा न्यायनिवाडा इंग्रजांच्या न्यायपद्धतीच्या तत्त्वांनुसार होईल. भारतीय न्यायपद्धतीची तत्वे त्यावर लागू होणार नाहीत. किती शरमेची गोष्ट आहे ही, कि आपल्याला आत्तासुद्धा इंग्रजांचे अनुसरण करावे लागेल.

–> भारतात स्वातंत्र्य लढा झाला तेव्हा तो ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात होता आणि करारानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारत सोडून जावे लागणार होते, ती गेलीसुद्धा पण या करारामध्ये हे सुद्धा आहे कि, भारतामधून ईस्ट इंडिया कंपनी जाईल पण बाकी 126 विदेशी कंपन्या भारतातच राहतील आणि भारत सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देईल आणि त्याचाच परिणाम आहे कि, ब्रुक बॉन्ड, लिप्टन, बाटा, हिंदुस्तान लीवर (आता हिंदुस्तान युनिलीवर) यांसारख्या 126 कंपन्या स्वातंत्र्यानंतरही इथे टिकल्या आहेत आणि आजसुद्धा आपल्याला लुटत आहेत. (सटर-फटर औषधे महाग किमतींना विकणाऱ्या काही कंपन्यांचा नफा आपल्या देशात 35,000% टक्के होता..) [यांना माजही इतका आहे कि ग्राहकांना इंग्रजीशिवाय इतर भाषेमध्ये उत्पादनांची माहिती उपलब्ध करून देण्यासही नकार देतात].

–> इंग्रजीचे स्थान तसेच राहील जसे कि आत्ता (1946 मध्ये) आहे आणि हा सुद्धा करारातील एक भाग आहे. तुम्ही पहा कि, आपल्या देशामध्ये संसदेत, न्यायालयांत, कार्यालयांमध्ये, शिक्षण पद्धतीत इंग्रजी आहे.. पण देशातल्या 99% टक्के लोकांना इंग्रजी येत नाही. आणि येत असलेल्या 1 % लोकांची हालत बघा कि त्यांना माहीतच नसते कि त्यांना वाचायचे काय आहे, आणि UNO मध्ये जाऊन भारताच्या जागी पोर्तुगीजांचे भाषण वाचतात.

–> तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिले असेल कि, स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांपर्यंत संसदेत वार्षिक बजेट संध्याकाळी 5:00 वाजता सादर केले जायचे, कारण माहिती आहे का? कारण आपल्या देशात संध्याकाळचे 5 वाजले कि, लंडनमध्ये सकाळचे 11:30 होतात, आणि इंग्रज त्यांच्या सोयीनुसार हे ऐकू शकतील, त्या बजेटवर समीक्षा करू शकतील म्हणून..! इतक्या गुलामीमध्ये आपला देश आहे. हा सुद्धा करारामधीलच एक भाग आहे.

–> 1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर इंग्रजांनी भारतामध्ये रेशन कार्ड ची व्यवस्था सुरु केली होती कारण दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांना अन्न-धान्याची जरुरत होती आणि भारतामधून हे धान्य त्यांना हवे होते, म्हणून त्यांनी इथे जनवितरण प्रणाली आणि रेशन कार्डाची सुरुवात केली.  ही प्रणाली या देशात आजसुद्धा लागू आहे कारण ती त्या करारामध्ये आहे. याच रेशन कार्डाला ओळखपत्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली गेली आणि स्थिती तीच आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड असायचे त्यांनाच मतदानाचा अधिकार होता, अजूनही बऱ्याच ठिकाणी मुख्य ओळखपत्र म्हणून रेशन कार्डच वापरले जाते.

–> इंग्रज येण्याआधी या देशामध्ये गायींना कापण्यासाठी कत्तलखाने नव्हते, मुघलांच्या वेळी तर हा कायदा होता कि, जर कुणी गायीला कापले तर त्याचा हात तोडला जात असे.  इंग्रज इथे आल्यानंतर त्यांनी कलकत्त्यात पहिल्यांदा गायींचा कत्तलखाना सुरु केला, दारूची दुकाने, कुंटणखाना सुरु केला, आणि जिथे जिथे इंग्रजांची छावणी असायची तिथे-तिथे कुंटणखाना, दारूची दुकाने, गायींचा कत्तलखाना उघडला गेला. अशा पूर्ण देशामध्ये इंग्रजांच्या 355 छावण्या होत्या, आणि हे सर्व का बनवले गेले ते तुम्ही सहज समजू शकता. इंग्रज गेल्यानंतर हे सर्व बंद व्हायला हवे होते पण हे बंद झालेले नाही, कारण ते करारामध्ये आहे.

–> आपल्या देशामध्ये जे संसदीय लोकतंत्र आहे, हे खरेतर इंग्रजांची वेस्टमिन्स्टर प्रणाली आहे. ही इंग्लंडची संसदीय प्रणाली आहे. ही कोठूनही संसदीय नाही आणि लोकतांत्रिकही नाही ! परंतु, या देशात हीच प्रणाली आहे कारण तसे या करारात सांगितले आहे. आणि याच वेस्टमिन्स्टर प्रणालीला महात्मा गांधी वांझ आणि वेश्या म्हणायचे (अर्थ तर तुम्हाला समजला असेल)..

        अशा हजारो अटी आहेत. मला आत्ता जितक्या तुम्हाला समजाव्यात अशा वाटल्या त्या नमूद केल्या आहेत, याचा अर्थ असा आहे कि, या देशामध्ये आत्ता जे काही चालू आहे ते सर्व इंग्रजांचे आहे, आपले काही नाही. आता तुमच्या मनात असा विचार आला असेल कि पूर्वीच्या राजांना तर इंग्रजी येत नव्हती तरी अशा दुष्ट करारांमध्ये (दुष्ट डावांमध्ये) फसून त्यांनी त्यांचे राज्य गमावले आणि स्वातंत्र्यावेळच्या नेत्यांना तर चांगली इंग्रजी येत होती मग या करारांमध्ये ते कसे काय फसले? याचे कारण थोडे भिन्न आहे, कारण स्वातंत्र्यावेळचे नेते इंग्रजांना त्यांचा आदर्श मानत होते म्हणून जाणून-बुजून त्यांनी हा करार केला. ते मानायचे कि, इंग्रजांशिवाय जगात कोणी मोठे नाही ! (अजूनही काहीजण म्हणत असतात इंग्रजांनी देशात सुधारणा केल्या म्हणे !!)

भारताच्या स्वातंत्र्य काळातील नेत्यांची भाषणे आपण वाचतील तर तुम्हाला लक्षात येईल कि, ते फक्त दिसायला भारतीय होते पण मन, कर्म आणि बोलीतून इंग्रजच होते. ते म्हणायचे कि इंग्रजच आदर्श आहेत, इंग्रजांनि दिलेली शिक्षण व्यवस्था आदर्श आहे, कृषी व्यवस्था इंग्रजांची आदर्श आहे, कायदे, न्याय व्यवस्था इंग्रजांची आदर्श आहे. आपल्या स्वातंत्र्य काळातील काही नेत्यांना इंग्रजांशिवाय सर्वात मोठा आदर्श कोणी दिसत नव्हता, ते म्हणायचे आम्हाला इंग्रजांसारखे बनायचे आहे, ते आम्हाला ज्या मार्गावर नेतील त्या मार्गावर आम्ही चालू, म्हणूनच अशा मूर्ख करारांमध्ये ते फसले. आणि जर तुम्ही त्यांना देशभक्त मानत असाल तर तो तुमचा डोक्यातील भ्रम बाहेर काढून टाका ! आणि जर तुम्हाला वाटत असेल कि ABC पक्षातले नेते खराब होते, पण XYZ पक्षातले नेतेसुद्धा काही दुधाने धुतलेले नव्हते. तुम्ही कोणालाही योग्य/चांगले समजू नका कारण स्वातंत्र्यानंतर 66 वर्षांमध्ये सर्वानीच जरी तो प्रादेशिक पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो, सर्वांनीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राष्ट्रीय स्तरावर सत्तेचा स्वाद घेतला आहे. तरीही….

        इंग्रजांच्या काळात भारत गुलामगिरीत होता, इंग्रजांना जाऊन 66 वर्षांनंतरही 2013 मध्ये वातावरण जसेच्या तसे आहे कारण आपण करार केलेला आहे आणि देशाला या भयानक करार व अटींच्या चक्रव्युहात फसविले आहे. खूप दुःख होते, आपल्या देशाबद्दल जाणून घेतल्यानंतर आणि त्यावर विचार केल्यावर… हे बदलणे गरजेचे आहे, आणि आपल्या सरकार बदलावे लागणार नाही तर व्यवस्था बदलावी लागेल, आणि जर तुम्ही विचार करत असाल कि कोणी मसीहा/अवतार येईल आणि सर्व बदलून टाकेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. कोणी  राम, हनुमान, कृष्ण येणार नाही हे बदलायला ! तुम्हाला आणि आम्हालाच अवतारामध्ये येउन, आपल्या हृदयातील देवता (राम/कृष्ण/मानवता) जागवून, स्वतःचे डोळे उघडून, रस्त्यांवर उतरावे लागेल, आणि या व्यवस्थेला मुळापासून नष्ट करावे लागेल. देव पण त्याचीच मदत करतो, जो स्वतःची मदत स्वतःच करतो.

Flag Of India

        

         इतक्या मोठ्या लेखाचे धैर्याने वाचन केल्याबद्दल आपले धन्यवाद ! आणि जर मनाला पटत असेल तर नक्कीच फेसबुक व इतर सोशल मीडियामधील आपल्या मित्रांपर्यंत हा लेख पोहोचवा, ज्ञान प्रवाहित होत राहूद्यात !!

स्वदेशीचे प्रखर समर्थक, राजीव दीक्षित

(स्वर्गीय श्री. राजीव दीक्षित यांच्या हिंदीतील लेखाचा/भाषणाचा हा मराठी अनुवाद आहे.)

Facebooktwittergoogle_plusredditlinkedinmailFacebooktwittergoogle_plusredditlinkedinmail

About Sourabh Bhunje

Sourabh Bhunje, B.E. IT from Pune University. Currently Working at Techliebe. Professional Skills: Programming - Software & Mobile, Web & Graphic Design, Localization, Content Writing, Sub-Titling etc.

Leave a comment